दोघा भावाकडून पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा रागातून सख्या दोन भावाने पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्यात घडला असून पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. कल्लू नागेंद्र डुबे (२५) व सोनू नागेंद्र डुबे (२१, दोघे रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घाडला आहे. चाकण पोलिसांनी चौकशीसाठी नागेंद्र डुबे यांना आणले होते. यावरुन नागेंद्र यांची मुले कल्लू व सोनू हे दोघे पोलीस ठाण्यात आले. आमच्या “वडीलांना पोलीस ठाण्यात का घेऊन आलात”, तुला माहीत नाही का आम्ही कोण आहे असे म्हणून उपनिरीक्षक कठोरे यांच्या अंगाावर धावून गेले आणि हातावर जोरात फटका मारला. तसेच त्यांना धक्का देऊन खाली पाडत लाथा बुक्याने मारून शिवीगाळ करत दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा, मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तपास चाकण पोलीस करीत आहेत.