‘मॉब लिंचिंग’मध्ये तिघांचा मृत्यू, बिहारमधील छपर्‍यात चोरीच्या घटनेचं प्रकरण

बिहार : वृत्तसंस्था – देशात मॉब लिंचिंगचे प्रकार वाढले आहेत. बिहारमधील सारण जिल्ह्यात मॉब लिंचिंगचा प्रकार घडला आहे. गायी-गुरे चोरी करण्याच्या संशयावरून शुक्रवारी काही लोकांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत ३ लोकांचा जीव गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील वातावण तापलेले असून पोलीसांनी या घटनेची त्वरीत दखल घेतली आहे.

रात्री पिकअप गाडी घेऊन येतात आणि गायी-गुरांना चोरी करण्याच्या घटना घडत होत्या. स्थानिक लोकांना यांसंबधी माहिती मिळाली होती. त्यानंतर या माहितीवर कोणतीही ठाम माहिती न मिळवता या तीन संशयित लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या तिघांसोबत अजून एक व्यक्ती होता. मात्र तो या हारहाणीतून पळ काढण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे.

स्थानिक लोकांनी या संशयित चोरांना एवढे मारले की त्यात त्यांच्या मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी या चोरांची गाडी आपल्या ताब्यात घेत घटनेची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. तर मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबातून दुःख व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, देशात मॉब लिंचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कालच म्हणजे १८ जुलै रोजी मध्य प्रदेशमध्ये बकरी चोरीच्या आरोपावरून तीन तरूणांना मारहाण करण्यात आली होती. तसंच या युवकाच्या बाईकला आग लावण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांनी या तीन तरुणांसह त्यांना मारणाऱ्या ५ लोकांना अटक करण्यात आली होती. तसंच आता पोलीस बिहारमधील घटनेत काय भूमिका घेत कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.