नामांकित कंपनीचे मोबाईल चोरी करून कमी किंमतीत विकणारे दोन जण ताब्यात

पिंपरी  :  पोलीसनामा ऑनलाइन – नामांकित कंपनीचे मोबाईल चोरून ते कमी किंमतीत विकणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींच्या  चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दोन्ही आरोपींना चिंचवड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून १६ मोबाईल जप्त केले आहेत. त्याची किंमत लाखो रुपयांचा घरात आहे. ही कामगिरी चिंचवड पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई माने यांना गुप्त माहीती मिळाली की चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयाच्या पुलाखाली आरोपी आहेत.त्यानुसार चिंचवड पोलिसांनी सापळा करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून १६ मोबाईल जप्त केले आहेत.ते कमी किंमतीत मोबाईल विकायचे यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी मौज मजा करायचे.

काही दिवसांपूर्वी या दोन अल्पवयीन आरोपीनि चिंचवड रेल्वे स्टेशन मागे चिंचवड येथून एका इसमास मारहाण करून मोबाईल व पैसे हिसकावले होते.त्यामुळे त्यांचा शोध चिंचवड पोलीस घेत होते.ताब्यात अल्पवयीन मुलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शहरातील निगडी,चिंचवड,चिखली,मोबाईल हिसकावल्याचे कबूल केले आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ स्मार्तना पाटील,पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे,पोलीस निरीक्षक खुळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा निरीक्षक अभिजीत जाधव,पो ना स्वप्नील शेलार, पो ना विजयकुमार आखाडे, पो ना राजेंद्र शिरसाठ, पो ना रूषीकेश पाटील,पो शि पंकज भदाणे, पो शि गोविंद डोके,पो शि अमोल माने, पो शि सचिन वर्णेकर, मपोना वंदना गायकवाड पो ना राजू जाधव यांनी केली आहे.