गेल्या 8 वर्षापासून IAS आणि IPS अधिकारी बनून ‘साहेब’गिरी करत त्यांनी घातली अनेकांना ‘टोपी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएएस आणि आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत दोन व्यक्तींनी मागील आठ वर्षांपासून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. नोयडा पोलिसांनी या दोघा महाभागांना ताब्यात घेतले आहे.

अशुतोष राठी आणि गौरव मिक्षा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात पोलिसांकडे खंडणी मागत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांना सेक्टर १८ मधील मेट्रो स्टेशनवर अटक करण्यात आली. या दोघांची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून खाकी गणवेश, आयएएस, आणि आयपीएस बँजेस आणि बनावट ओळखपत्र जप्त केले.

https://twitter.com/ANINewsUP/status/1157082064241463301

ज्या व्यक्तींनी या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला आहे की, या आयएएस आणि आयपीएस असल्याची बतावणी करणाऱ्या दोघांनी राजकीय नेत्यांचे नाव घेऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. याशिवाय या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे देखील काम केले. नोयडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांची ही माहिती दिली.

दिल्लीत याआधी देखील अशाच घटनांमधून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्लीत जो प्रकार घडला होता. यात दि्ल्ली पोलिसांची भरती परिक्षा पास होत नसल्याने एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर आणि नातेवाईकांवर छाप पाडण्यासाठी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली होती. या तरुणाचे नाव आशिष चौधरी असे नाव असून दिल्ली पोलिसांकडून त्यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त