1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनची ‘कबर’ विकण्याच्या आरोपाखाली 2 लोकांविरूद्ध FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनची कथित कबर विकण्याच्या आरोपाखाली दोन लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकूबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमनने यासंदर्भात एक एफआयआर दाखल केली होती आणि आरोप केला होता की, मेमनसोबत अन्य 3 कबरसुद्धा पाच लाख रूपयात विकण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी 19 मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु या दरम्यान कोरोना व्हायरस महामारीच्या संकटामुळे पोलीस त्यामध्ये गुंतले होते. आता पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे आणि दोन लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये जजील नवरंगे आणि परवेज सरकरे यांच्या नावाचा समावेश आहे.

नवरंगे आणि परवेज दोघेही बॉम्बे ट्रस्टच्या जुमा मशिदीचे ट्रस्टी आहेत. या अंतर्गत मुस्लिम बडा कब्रस्तान सुद्धा नोंदणीकृत आहे. आरोप आहे की, याच दोघांनी कबर विकली. मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपुर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आल्यानंतर बडा कब्रस्तानमध्ये 30 जुलै 2015 ला दफन करण्यात आले होते.

एका अधिकार्‍याने सांगितले की, कबरचे ठिकाण विकल्याच्या तक्रारीसह मेमनच्या एका नातेवाईकाने मार्चमध्ये लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांनी म्हटले, मेमनच्या कुटुंबियांना कब्रस्तानमध्ये कबरसाठी सात जागा देण्यात आल्या आहेत. चार्टर्ड अकाऊंन्टट असाणारा याकूब 1993 च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी टायगर मेमनचा छोटा भाऊ होता.

त्यांनी म्हटले की, कोविड-19 च्या स्थितीमुळे पोलिसांनी प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे. अधिकार्‍याने सांगितले की, तक्रारीच्या आधारावर भादवि कलम 465, 468 अंतर्गत यावर्षी 19 मार्चला दोन लोकांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.