मुळशी धरणात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुळशी धरण परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोमवारी (दि.1) दोघांचा बुडून मृत्यू झाला. बुडून मृत्यू झालेल्या दोघांचेही मंगळवारी (दि.2) मृतदेह सापडले. वळणे येथील घटनेत किशोर अनंता फाटक (वय 42 रा. शिरवली, ता. मुळशी) याचा, तर ढोकळवाडी येथे अरुणाचल प्रज बिहारी (वय-20 रा. उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला.

किशोर व त्याचे मित्र सोमवारी वळणे येथे गेले होते. तर अरुणाचल व त्याचे मित्र ढोकळाडी येथे मुळशी धरणाच्या पाण्याजवळ फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते पाण्यात बुडाले. या दोन्ही घटनांमध्ये परिसरात दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे दारू पिऊन पोहण्याचा प्रयत्नात ते बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सोमवारी अंधार व पाऊस असल्यामुळे शोधकार्यात अडथळा आल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास किशोर याचा मृतदेह आढळून आला. तर तीनच्या सुमारास अरुणाचल याचा मृतदेह सापडला. पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार मंगेश लांडगे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य व अग्निशमक दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like