सोन्याच्या बिस्कीटांचा मोह ज्येष्ठ महिलेला पडले महागात, भामट्यांनी लंपास केले ४८ हजारांचे दागिने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला सोन्याचे बिस्कीट देण्याचे अमिष दाखवून भामट्यानी महिलेकडील ४८ हजार रूपयांचे दागिने लांबविण्याची घटना हडपसर भागात घडली.

मुक्ताबाई जवळकर (वय ६५,रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई या मुळच्या आळंदी म्हसोबाची या गावच्या राहणाऱ्या आहेत. त्यांची मुलगी हडपसर परिसरात राहण्यास आहे. दोन दिवसांपूर्वी त्या हडपसर भागातील विधाते कॉलनीजवळून जात होत्या. त्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना आमच्याकडे सोन्याचे बिस्किट आहे. तुमचे दागिने दिल्यास त्याबदल्यात सोन्याचे बिस्किट देतो, असे आमिष जवळकर यांना दाखवले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिने काढून घेतले भामट्यांनी त्यांना सोन्याचे बिस्कीट म्हणून पिवळसर रंगाच्या धातूचे बिस्किट दिले. बिस्कीट दिल्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. परंतु त्यांनी त्या बिस्कीटाची सहानिशा केली तेव्हा बिस्कीट सोन्याचे नसल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक माणिक डोके तपास करत आहेत.

Loading...
You might also like