पुण्याच्या बुधवार पेठेतील जुना वाड्याचा काही भाग कोसळला, वृद्धेसह दोघे जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – आज सकाळी बुधवार पेठ मध्ये जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन जणांसह एक वृद्ध महिला अडकलेली होती. त्यांना अग्निशामक दलाने सुखरूप बाहेर काढले.

पुण्याच्या बुधवार पेठत 100 वर्षाचा जुना वाडा आहे. त्या वड्याचा ७५ % भाग हा कोसळला आहे. त्यामध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेसह दोघेजण अडकले होते. याची माहिती अग्निशामक दलाला दिली, त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहचले. त्यानंतर त्यांनी अडकलेल्या वृद्ध महिलेसह आणखी जखमी व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले.

अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले. पहिल्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील दोघे जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजले. गंगुबाई कल्याणी (वय ७०) आणि विनायक कल्याणी (वय ४८) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती अग्निशामक अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिली.