खालापूर टोल नाक्याजवळ भीषण अपघात, 2 जण जागीच ठार तर चौघे जखमी

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रेलरने स्विफ्ट कार आणि टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याचे समजते. हा अपघात खालापूर टोकनाक्यानजीक सोमवारी सकाळच्या सुमारास घडला. अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून, ट्रेलरसह टेम्पोही महामार्गावर आडवा पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातस्थळी महामार्ग पोलिस, आयआरबी कंपनीचे देवदूत पथक आणि स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवला असून, जखमींनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, मृतांची ओळख आद्याप पटली नसून, अधिक तपासून सुरू आहे.