बँकेच्या विलीनीकरणाबाबत सरकार मोठा निर्णय ?, लवकरच ‘या’ बँकांचे विलीनीकरण होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग सेक्टरमध्ये सुधार करण्यासाठी मोदी सरकार मोठया प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या टर्ममध्ये मोदी सरकार भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त भर देताना दिसून येत आहे. आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारने विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा मोदी सरकार दोन टप्प्यांमध्ये देशातील छोट्या बँकांचे विलीनीकरण करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

या निर्णयामागे सरकारचा विचार भ्रष्टाचाराला आळा घालणे, त्याचप्रमाणे देशभरातील बँकिंग प्रणालीमध्ये सुसूत्रता आणणे हा आहे. त्याचबरोबर बँकांची संख्या कमी झाल्याने कामकाजात सुसूत्रता येईल. त्याचबरोबर बँकांचा तोटा देखील कमी होईल. त्याप्रमाणे या विलीनीकरणाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच पार पडेल अशी माहिती मिळत आहे.

मोदी सरकार यापूर्वीच बँकांची संख्या कमी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच लवकरात लवकर हे विलीनीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात पंजाब नॅशनल बँकेत दोन बँकांचे विलीनीकरण होणार आहे. या दोन बँका या बँक ऑफ महाराष्ट्र आणि अलाहाबाद बँक आहेत.

दरम्यान, ज्या बँकांचे विलीनीकरण करण्याचा विचार आहे, त्या बँकांशी अर्थ मंत्रालयाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे यासाठी कॅबिनेट नोट देखील तयार झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), आंध्र बँक यूनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार असल्याचे समजत आहे. जर या बँकांचे विलीनीकरण झाले तर देशात फक्त SBI, BoB, PNB, केनरा, BoI या पाच प्रमुख बँका शिल्लक राहतील. हि माहिती समोर येत असली तरी सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही आधिकारीक माहिती समोर आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like