बँक ऑफ महाराष्ट्रचे ‘या’ बँकेत ‘विलनीकरण’ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग क्षेत्रातील बदलांसाठी मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात त्यासंबंधी काही मोठे निर्णय घेण्यासाठी तयारी करत आहे. पहिल्या कार्यकाळात सरकारने बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँकेचे विलनीकरण करण्यात आले होते. आता सांगण्यात येत आहे की सरकार छोट्या छोट्या बँकेचे मोठ्या बँकेत विलनीकरण करण्यासाठी नियोजन करत आहे.

सरकारचे म्हणणे आहे की जेवढ्या कमी बँका असतील तर आधिक उत्तम काम होईल. याचा फायदा होऊन बँकेला होणाऱ्या तोट्यावर नियंत्रण राहिलं, आता दुसऱ्या टप्यात ज्या बँकांचे विलनीकरण केले जाणार आहे. त्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

महाराष्ट्र बँकचे होऊ शकते पंजाब नॅशनल बँकेत विलनीकरण –
तसे पाहिले तर मोदी सरकाराच हा प्रयत्न आहे की बँकांची संख्या कमी करुन त्यांना संघटीत केले जावे, मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेत 2 बँकांचे विलनीकरण होऊ शकते, या दोन बँका म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि इलाहाबाद बँक. या दुसऱ्या टप्यात या बँकाचे विलनीकरण करण्याचा गंभीर विचार सरकार करत आहे. तसेच आणखी 2 – 3 बँकांचे बँक ऑफ इंडियामध्ये विलनीकरण होऊ शकते, त्यात ओरियंटल बँक, आंध्र बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या विलनीकरणचा विचार सरकार सध्या करत आहे.

तर देशात उरतील फक्त या 5 बँका –
जर या टप्यात विलनीकरण झाले तर देशात फक्त 5 बँका शिल्लक राहतील, आणि याच 5 बँका सर्व बँकांचे नेतृत्व करतील. ज्यात एसबीआय, बँक ऑफ इंडिया, पीएनबी, कँनरा, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बैंक ऑफ कॉमर्स (OBC) या बँकाचे समावेश असेल. असे असले सरकारकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Loading...
You might also like