सांगवीत दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी, दरोडा विरोधी पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याकडून एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर, एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

ओंकार किसन शिंगोरे (19, रा. काटे पुरम चौक, पिंपळे गुरव) आणि गणेश हनुमंता मोटे (20, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक पथक सांगवी परिसरात अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस नाईक शैलेश सुर्वे आणि आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी ओमकार शिंगोरे व गणेश मोटे हे दुचाकीवरून पिंपळे गुरव भागात फिरत आहेत. तसेच त्यांच्या जवळ पिस्तूल आहे.

पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, गणेश हजारे, शैलेश सूर्वे, अशिष बोटके, किरण काटकर, उमेश पुलगम, शरीफ मुलाणी, सागर शेडगे यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून दोघांना पिंपळे गुरव येथील शेवटच्या बस स्टॉपवरून ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपयांचा ऐवज मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like