सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुल, तीन काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

कासारवाडी येथे आलेल्या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदेशीर दोन पिस्तुल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखा पथकाने केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d81fe076-ce3b-11e8-a710-c3259b19c586′]

केविन जॉर्ज अंथोनी (२३, रा. विल्यमनगर, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासारवाडी परिसरात एक सराईत गुन्हेगार येणार असून त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश  सावंत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक उत्तम तांगडे, सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पाटील, रुपाली मरळे, प्रमोद वेताळ, राजू केदारी, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, गणेश सावंत, प्रवीण पाटील, स्वप्नील शिंदे या पथकाने सापळा रचला.

पोलिसांनी कासारवाडी येथील दर्गा परिसरात सापळा रचला. संशयित आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df0ea04d-ce3b-11e8-bf67-679602388e91′]

जमिनीच्या वादातून भावाला मारहाण

पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पारखे वस्ती, माण येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला सायकलच्या चेनने मारहाण केल्याची घटना घडली आहे. अनिता दिलीप पारखी (३५, रा. पारखीवस्ती, अपंग शाळेजवळ, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र लक्ष्मण पारखी (४३, रा. पारखीवस्ती, अपंग शाळेजवळ, माण, ता. मुळशी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप लक्ष्मण पारखी असे जखमी इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारखी यांची माण येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या वाटण्यावरून दिलीप आणि राजेंद्र या दोघा सख्या भावांमध्ये वारंवार भांडण होत होते. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिता आणि दिलीप हे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत घरासमोर बोलत थांबले होते. त्यावेळी दिलीप यांचे थोरले बंधू राजेंद्र तिथे आले आणि त्यांनी सायकलच्या चेनने दिलीप यांना मारहाण केली.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e862a047-ce3b-11e8-88a9-6bf3c179166f’]

यामध्ये दिलीप यांच्या डोक्यात, कानावर आणि चेह-यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून दिलीप यांच्या पत्नी अनिता यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.