महाकाली टोळीतील सदस्याकडून दोन पिस्तुल जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

निगडी, ट्रान्सपोर्टनगर येथे स्वतः जवळ बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या महाकाली टोळीतील एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ९१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b043c25-b10a-11e8-81e6-ff055631d6a4′]

साजन मन्नु मेहरा (२५, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, देहूरोड) याला अटक केली आहे. निगडी, भक्ती शक्ती येथे एक जण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती तपासी पथकाचे कर्मचारी किशोर पढेर आणि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र जाधव, शंकर अवताडे, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, संदिप पाटील, किशोर पढेर, नारायण जाधव, विलास केकाण, आनंद चव्हाण, स्वामींनाथ जाधव, घनवट या पथकाने सापळा रचला.

ट्रान्सपोर्टनगर येथील पीएमपीएमएल बस थांब्याच्या भिंती लगत साजन हा कंबरेला पिस्तूल लावून उभा असल्याचा आढळून आला. तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. साजन हा पूर्वी महाकाली टोळीचा सदस्य असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तपास निगडी पोलीस करत आहेत.

जाहीरात