फिक्स पॉईंटवर गैरहजर, दोन पोलीस कर्मचारी निलंबीत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक स्थीर निरीक्षण पथकात फिक्स पॉईंटला नेमणूक करण्यात आलेली असताना अनधिकृतरित्या गैरहजर राहणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जळगाव पोलीस अधिक्षकांनी निलंबित केली आहे.

हेड कॉन्सटेबल कैलास पाटील व हेड कॉन्सटेबल राजेंद्र बोरसे अशी दोघांची नावे आहेत. कैलास पाटील हे धरणगाव पोलीस ठाण्यात तर राजेंद्र बोरसे हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचा भाग म्हणून पोलिसांकडून अवैधपणे पैसे, मद्य आणि इतर गोष्टींची वाहतुक रोखण्यासाठी लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांकडून काही फिक्स पॉईंट तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. तेथे स्थीर सर्वेक्षण फिक्स पॉईन्टसवर पोलीस कर्मचारीऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. दरम्यान १८ एप्रिल रोजी चार ते बारा वाजेपर्यंत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ पोलीस कॉन्सटेबल पाटील आणि बोरसे या दोघांची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी धरणगाव पोलीस निरीक्षकांनी साडेचारच्या सुमारास या फिक्स पॉईंटवर तपासणी केली तेव्हा ते दोघेही तेथे गैरहजर होते. त्यानंतर त्यांचे हे वर्तन गंभीर असल्याने याप्रकरणी दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढला आहे.

दरम्यान या निलंबित केलेल्या काळात त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात करण्यात आली असून दररोज सायंकाळी पोलीस निरीक्षकांकडे हजेरी लावावी लागणार आहे.