२ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मेहकर : पोलीसनामा ऑनलाइन – बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील २ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन अधिकाऱ्यांवर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.२१) घडली.

प्रकाश विश्वनाथ कंकाळ (वय-५५) आणि वसंतराव काळदाते (वय-५७) असे मृत्यू झालेल्या २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. प्रकाश कंकाळ हे जानेफळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर काळदाते हे लोणार पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

दुर्दैवी योगायोग म्हणजे दोघांवरही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयातील लगतच्या कॉटवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाला. या दोघांना रविवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे दोघांनाही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांचाही एकाच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला.

बुलढाणा पोलीस दलातील २ अत्यंत अनुभवी जवान आम्ही दुर्दैवाने गमावले आहेत. एकाच वेळी एकाच हॉस्पीटमध्ये लगतच्या कॉटवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण पोलीस दल त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना शासकीय मदत देण्याची प्रक्रियाही शिघ्रगतीने पूर्ण करण्यात येईल, असे बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.