जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 पोलीस शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील नौगाव सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर एक कर्मचारी जखमी झाला आहे.

जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक होत आहे. त्यामुळे जम्मू -कश्मिरमध्ये पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे.