जमावाचा पोलिसांवर हल्ला, २ पोलीस जखमी

नंदुरबार  : पोलीसनामा ऑनलाईन – हाणामारीचे प्रकरण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे घडली आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे शनिवार (दि.१३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भिल्ल आणि कोळी वसाहतीमधील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण सोडवण्यासाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस वाहन घेऊन त्या ठिकाणी गेले. तेथे ज्ञानेश्वर शिवराम भिल, तुकाराम शेमले, सरदार भिल, अंकुश चुनीलाल भिल यांच्यासह सहा जणांनी जमावासमवेत येऊन पोलीस वाहनावर हल्ला केला.

या जमावाने पोलीस वाहन आणि पोलिसांवर दगडफेक केली. तसेच काठ्या घेऊन वाहनावर आणि पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश अहिरे आणि बापू बागुल हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like