वर्दीवरच ‘तर्रर्र’ असलेल्या 2 पोलिस कर्मचार्‍यांचे तडकाफडकी निलंबन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दारू पिऊन पोलीस मुख्यालयात धिंगाणा घालणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. गणेश अशोक खेडकर (बक्कल नंबर 572), सुजित पंडित देवरे (बक्कल नंबर 151) यांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, पोलीस कर्मचारी खेडकर आणि देवरे दोघेही दारू पिऊन पोलीस मुख्यालयात आले होते. मुख्यालयातच त्यांचा वाद झाला. काही वेळाने उपविभागिय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद सोडवला आणि दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलीस मुख्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी पोलीस कर्मचारी खेडकर आणि देवरे यांचे तडकाफडकी निलंबन केले.

You might also like