लाचेच्या रक्कमेवरून पोलिस पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघे तडकाफडकी निलंबीत (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : लाचेच्या रक्कमेवरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तुबळ हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे ही हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये दोन पोलिस एकमेकांना ‘धो-धो’ धुत आहेत.

याबाबत प्रयागराजचे पोलिस अधीक्षक (गुन्हे) अशुतोष मिश्रा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपुर्वीची ही घटना आहे. दोन पोलिस कर्मचाèयांमध्ये लाचेच्या रक्कमेवरून वाद होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, त्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिस अधीक्षकांनी त्यांना निलंबीत केले असल्याचे सांगितले आहे. याप्रकणाचा तपास देखील युध्दपातळीवर चालु असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like