गाडीत बसण्यावरून 2 पोलिसांत ‘हाणामारी’ !

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील वाढती गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान गस्तीच्या वाहनात पुढे कोण बसणार या कारणावरून दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याऐवजी पोलिसांवर अंकुश ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली असल्याची चर्चा सध्या नेटकरी करत आहेत.

उत्तर प्रदेशात गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून पोलिसांसाठी गस्तीसाठी वाहने पुरवण्यात आली आहेत. मात्र, या वाहनात पुढे कोण बसणार यावरून दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. पोलिसांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या हाणामारीत पोलिसांची गाडी दिसत आहे. दोन पोलीस रस्त्याच्या कडेला पोलीस गणवेशात दिसत आहेत. यामध्ये एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला रस्त्याच्या कडेला नेत मारहाण केली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातून हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. शेवटी दोघातील हाणामारी तिसरा पोलीस कर्मचारी येऊन सोडवताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओतील पोलिसांची ओळख पटली असून कॉन्स्टेबल राजेश सिंग, सुनिल कुमार अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या पोलीसाचे नाव समजू शकले नसून हे तीनही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. दोघांनीही एकाचवेळी पुढील सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. यामुळे ढकलाढकली झाली आणि प्रकरण हातघाईवर गेले.

आरोग्यविषयक वृत्त –