लुटमारीतील दोन अट्टल चोरट्यांना २४ तासात अटक

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

वाळवा तालुक्यातील आष्टा येथे एकाला मारहाण करून रोकड, मोटारसायकल, मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोन संशयितांना 24 तासात अटक करण्यात आली. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. दोघेही संशयित अट्टल चोरटे असून त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B07DYFX2C8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’822ff09f-ab3b-11e8-b35e-6922b2901fc0′]

सागर विठ्ठल नाईक (वय 27, रा. कारंदवाडी, ता. वाळवा, सध्या रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ), निशिकांत प्रशांत पाटील (वय 21, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 26 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास चरण (ता. शिराळा) येथील संजय पाटील पाऊस येत असल्याने आष्ट्यातील एका पिकअप शेडमध्ये थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी युवक तेथे आले. त्यांनी संजय पाटील यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दीड हजारांची रोकड, मोबाईल काढून घेतला. तसेच त्यांची मोटारसायकल घेऊन पळून गेले.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी चोरीतील संशयितांना पकडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना चोरीची मोटारसायकल घेऊन दोघे संशयित कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे येणार असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. मंगळवारी सकाळी पथकाने सापळा रचून कुकटोळी येथे दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आष्ट्यातील गुन्ह्याची कबुली दिली.

सांगली : सरकारी नोकरी लावण्याच्या अमिषाने दोन लाखांचा गंडा

त्यांच्याकडून चोरलेली मोटारसायकल, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, विजयकुमार पाटील, युवराज पाटील, विनोद चव्हाण, सतीश आलदर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2301e3b-ab3b-11e8-98a1-ed371192ef4c’]

सागर नाईक, निशिकांत पाटील हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही घरफोडीच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. काही दिवसांपूर्वीच शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर दोघांनी पुन्हा चोरीचा गुन्हा केला. त्यात त्यांना 24 तासांत अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.

 

साईबाबांच्या नावाने बनावट मतदान कार्ड काढण्याचा प्रयत्न