पुणे, सोलापुरात दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना पकडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करून फरार असलेल्या दोन दरोडेखोरांना पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसांसह सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना या दरोडेखोरांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून दरोडेखोरांना अटक करण्यात आली. या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

[amazon_link asins=’B01N4J3WAE,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e464e49b-b25d-11e8-816c-33ab8287aeba’]

दिनेश रविंद्र क्षीरसागर (२४, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), सचिन उत्तम महाजन (२४, सुरतवड, ता. इंदापूर, जि. पुणे) अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दिनेश क्षीरसागर याने सोलापूर शहरातील एमआयडीसी आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दरोडे घातले होते. दोघे दरोडेखोरांनी मिळून पुणे जिल्ह्यातील यवत, वालचंद नगर परिसरात दरोडे घातले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यांना अटक करण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आले.

या गुन्हेगारांची माहिती काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करत असताना एक सराईत गुन्हेगार ७० फूट रस्त्यावर येणार आहे अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिनेश क्षीरसागर याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्यासोबतच सचिन महाजन असल्याचे त्याने सांगितले. दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यातील १६ हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार, सहाय्यक फौजदार दगडू राठोड, बायस, हवालदार राकेश पाटील, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, जयसिंग भोई, सुभाष पवार, वसंत माने, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे, चालक निंबाळकर आणि काकडे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानातून उतरणार सिंधुदुर्गात