गळ्यात नोटांची ‘माळ’, डोळ्यावर काळा ‘गॉगल’ ! घोड्यावर निघाल्या नवरीच्या बहिणी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – डोळ्यांवर काळे गॉगल्स आणि गळ्यात नोटांचा हार घालून एखाद्या नवऱ्या मुलाप्रमाणे घोड्यावर स्वार होऊन निघाल्या नवऱ्या मुली हे वेगळे चित्र पहायला मिळाले हरियाणाच्या भवानी शहरात. या ठिकाणी घोड्यावर बसून दोन बहिणींची मिरवणूक काढण्यात आली. या दोनीही बहिणींचा विवाह गुरुवारी पार पडणार आहे.

हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी दोन तीन दिवस आधी मुलीला घोड्यावर बसवून तिची मिरवणूक काढण्याची या ठिकाणी मोठी प्रथा आहे. बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश यावेळी दोनीही मुलींनी दिली. यावेळी नवऱ्या मुलींसमवेत त्यांचे कुटुंबीय डीजेच्या तालावर ताल धरताना यावेळी दिसून आले.

याचे वैशिष्टय हे आहे की अशा प्रकारची मिरवणूक ही नवरदेवासाठी काढली जाते मात्र यावेळी मुलींसाठी ही मिरवणूक काढून घरच्यांनी एक चांगला संदेश दिला आहे. त्यामुळेच या मिरवणुकीमध्ये सर्व शहर वासीय सामील झाल्याचे आढळून आले.

मोनिका आणि कंचन यांनी यावेळी सांगितले की, आम्ही खूप खुश आहोत कारण आमचा विवाह होणार आहे. तसेच आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे आणि सुरुवातीपासून एखादा मुलाप्रमाणेच वागणूक दिली आहे. त्यामुळे मुली देखील मागे राहिलेल्या नाहीत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवरीच्या वहिनीने सांगितले की त्यांच्या कुटुंबामध्ये मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव केला जात नाही म्हणूनच ही मिरवणूक काढण्यात आली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा –