कोल्हापूर : ‘Virginity Test’ मध्ये फेल झाल्यामुळे 2 बहिणींचा जात पंचायतच्या माध्यमातून Divorce

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकणी दोन बहिणी व्हर्जिनिटी चाचणीत अयशस्वी झाल्या, त्यावेळी त्यांच्या पतीने जात पंचायतीच्या माध्यमातून घटस्फोटाचा आदेश पाठविला. आता सोशल मीडियावर ही बाब चर्चेचा विषय ठरला आहे.

पती, सासू आणि जात पंचायतविरोधात गुन्हा दाखल

‘द इंडियन एक्सप्रेस’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांचे पती, त्यांची सासू आणि जात पंचायतविरुद्धच्या केस दाखल केला आहे, ज्यांनी या दोन बहिणींना घटस्फोटाचा आदेश दिला.

गुरुवारी या प्रकरणात FIR नोंदविण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सासरी दोन्ही बहिणींची ‘Virginity Test’

तक्रारीनुसार, दोन्ही बहिणी कंजरभाट समाजातील आहेत. या दोन्ही बहिणींचे २७ नोव्हेंबर २०२० रोजी कोल्हापुरात राहणाऱ्या दोन मुलांसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सासरी त्या दोन्हींना वेगवेगळ्या खोलीत घेऊन जाऊन Virginity चाचणी केली गेली. ही त्यांच्या समाजाची एक प्रथा आहे.

Virginity Test मध्ये फेल झाल्यामुळे पतीने लावले गंभीर आरोप

Virginity Test मध्ये फेल झाल्यानंतर आरोपींनी दोन्ही बहिणींवर आरोप लावले आहेत आणि म्हंटले आहे की लग्नाआधी त्यांनी दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध बनवले आहेत. त्यानंतर दोघा पती-पत्नींमध्ये वाद वाढत गेले.

पीडित महिलांच्या तक्रारीनुसार, सासरी त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या घरच्यांनकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती. जेव्हा असे घडले नाही, तेव्हा दोन्ही बहिणींना घराबाहेर काढण्यात आले आणि त्यांचे पती घटस्फोट घेण्यासाठी जात पंचायतीत गेले.