कपडे धुण्यासाठी गेलेली दोन लहान मुले कॅनॉलमध्ये बुडाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर परिसरात रहाणारे दोन मुले आज (रविवार) कॉनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडाले. दोघापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरु आहे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास वैदूवाडी येथे घडली.

सुमित शिंदे (13, रा. वैदूवाडी, हडपसर) असे बेपत्ता मुलाचे माव आहे. तर, राहुल लोखंडे याला वाचविण्यात यश आले आहे.
[amazon_link asins=’B018KII2SA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78158da4-b403-11e8-94a1-ebc3eef3c0a6′]
सुमित आणि राहुल एकाच परिसरातील असून, ते दोघे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वैदूवाडी कॅनॉलवर कपडे धुण्यास गेले होते. कपडे धुतल्यानंतर पोहण्यास कॅनॉलमध्ये उतरले. मात्र, सध्या पावसामुळे कॅनॉलला पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त आहे. पोहत असताना दोघेही बुडू लागले. त्यावेळी येथील नागरिकांनी आरडा-ओरडा केला. राहुलला वाचविण्यात यश आले. मात्र, सुमित प्रवाहात बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशामक व स्थानिक नागरिक सुमितचा शोध घेत आहेत.