दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक; एकाचा मृत्यू

कोल्हापूरः पोलीसनामा आॅनलाईन
कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा रोडवर हा अपघात झाला असून, यामध्ये एका 62 वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाल आहे. तर 12 प्रवाशी जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन्ही बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. सतत पाऊस पडत असल्या कारणाने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fde37ec3-868f-11e8-b8d7-7dd7c0630db3′]
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, दरम्यान अपघातामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.