home page top 1

पुण्यातील 2 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा पवना धरणात बुडून मृत्यू

एक विद्यार्थी मुळचा अहमदनगरचा तर दुसरा विद्यार्थी नांदेडचा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमधील 2 विद्यार्थ्यांचा मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोघेही विद्यार्थी पवना धरण परिसरात फिरायला गेले असताना ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुजित जनार्दन घुले (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. अहमदनगर) आणि रोहित कोडगिरे (21, रा. एमएमसीओई हॉस्टेल, कर्वेनगर, पुणे. मुळ रा. पोलिस कॉलनी, नांदेड) अशी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे 11 विद्यार्थी हे आज (मंगळवार) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुयमारास ते फागणे गावाच्या बाजुने पोहण्याकरिता धरणाच्या पाण्यात उतरले. त्यांच्यापैकी सुजित आणि रोहित हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या मित्रांनी अथक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. दुर्देवी घटनेबाबत समजताच स्थानिकांनी धरण्याच्या पाण्यात त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रोहिताचा मृतदेह काढण्यात त्यांना यश आले मात्र सुजितचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर स्थानिकांनी लोणावळयातील शिवदुर्ग पथकाला पाचारण केले. पथकातील कपिल दळवी, रोहित आंद्रे, अनिल आंद्रे, मोरेश्‍वर मांडेकर, अतुल लाड, सुनिल गायकवाड, महेश मसणे, दुर्वेश साठे, आनंद गावडे, राजेश ठाकर, ढोकळे प्रविण, कडु सनी, जोशी समीर, प्रणय अंबुरे आणि राजेंद्र कडू यांनी पाण्यात शोध मोहिम राबविली. त्यांना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुजितचा मृतदेह शोधण्यात यश आले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading...
You might also like