धुळे : खरदे व पाडळदे गावात वीज पडुन २ विद्यार्थी ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील खरदे व पाडळदे गावात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. दुपारच्यावेळी खरेदी गावात वीज पडून शालेय विद्यार्थींनी दिपाली दगडू गिरासे मयत झाली.

तर पाडळदे येथे शेतातील झाडा जवळ तीन लहान मुले खेळत होती. झाडा जवळच म्हैस बांधलेली होती. अचानपणे पाऊस सुरु असताना झाडावर वीज कोसळली. यात पंकज ज्ञानेश्वर राठोड ११ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला. झाडाला बांधलेली म्हैस ठार झाली. हितेश संतोष राठोड वय १०, आनंद दत्ताञय राठोड वय ६ हे दोघे जखमी झाले.

यांना ग्रामस्थांनी तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात भरती केले. वीज पडून पंकज राठोड ठार झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like