शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील दोन विद्यार्थ्यांचा पोहताना शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

गणेश राजेंद्र वाढेंकर (वय १७) व श्रीकृष्ण सयाजी मतकर (वय १४) ही मयतांची नावे आहेत. गणेश वांढेकर हा नुकताच अकरावीची परीक्षा पास होऊन बारावीच्या शिकवणीसाठी तिसगाव येथे जात होता. श्रीकृष्ण सयाजी मतकर हा नववीमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता गणेश व श्रीकृष्ण हे दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु श्रीकृष्ण यास पोहता पोहता येत नसल्याने त्याने पोहताना गणेशला मिठी मारली व दोघेही बुडून मृत्युमुखी पडले.

सदर घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading...
You might also like