‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दोन आठवड्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दर्वेश सापूर आणि नवीन दलाल मंदोठी अशी या तरुणांची नावे आहेत. या दोघांनी एका व्हिडिओद्वारे या हल्ल्याची जबबाबदारी स्वीकारली होती.
[amazon_link asins=’B009C1623W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ef58026-a477-11e8-a421-11ccb12cfeae’]

उमर खालिद यांच्यावर संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात हा हल्ला केला गेला होता. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून उमर खालिदला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुदैवाने हल्लीखोराचा नेम चुकल्यामुळे उमर खालिद या हल्ल्यातून बचावला. उमरवर गोळीबार करणारा हल्लेखोर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या आधारे तपासही सुरु केला होता. तर सोशल मीडियावर दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या तरुणांनी व्हिडिओत उमरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

या हल्ल्यानंतर , दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओचा देखील तपास सुरु केला होता. व्हिडिओतील दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी हरयाणा व पंजाब पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. दिल्ली पोलिसांचे ३० जणांचे पथक लुधियानात संशयितांचा शोध घेत होते. अखेर रविवारी दोघांनाही हरयाणातून ताब्यात घेतले आहे. ‘त्यांच्या दाव्यांची चौकशी सुरु असून चौकशीनंतर सत्य समोर येईल’, असे पोलिसांनी सांगितले.
[amazon_link asins=’B008EODGDM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46ae1fbd-a477-11e8-ad38-d92fa5c539ca’]

हल्लेखोरांचे खळबळजनक उत्तर
दरम्यान, या व्हिडिओत दोन्ही तरुणांनी ‘आम्ही सुप्रीम कोर्ट आणि संविधानाचा आदर करतो. पण जेएनयूतील या टोळीचा खात्मा करण्याची गरज आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितले होते की पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारले पाहिजे. उमर खालिदवरील हल्ला ही स्वातंत्र्य दिनी देशवासियांना दिलेली भेट होती, असा म्हटले होते.