दोन गटात तुंबळ मारामारीत १ गंभीर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चौका,चौकात गँग तयार झाल्या आहे. किरकोळ वाद झाला की काही वेळात बऱ्याचदा समझोता होतो. नाहीतर दुसऱ्या गटातील जमावाला बोलवून मारामाऱ्या करत जखमी करण्या पर्यत मजल गाठली जाते.
याबाबत मिळलेली माहिती अशी की आज सकाळी दत्त मंदिर चौकात दोन तरुण गटात वाद झाला. बाचाबाची हि झाली. एकमेंकांना धमकवत तूला बघून घेईन असे दमदाट्या देत दोन्ही गटातील तरुण निघून गेले.

परंतू दुपारी चार ते पाच दरम्यान क्लास सुटल्यावर हे दोन्ही तरुण गटात परत वाद झाला यावेळी मारामारी करतेवेळी नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत तरुणांनी निर्माण केली एक तरुणाला चाकुने, कुऱ्हाडीने वार करत जखमी केले. परिसरात सुरू असलेल्या मारामारी पाहत नागरीकांनी पोलीसांना फोन केला. तरुणांची मारामारीची बातमी कळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलीसांसमोर मारामारी करत काही तरुणांनी घटनास्थळाहून पळ काढला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी भरती करण्यात आले.

उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे व पोलीस निरीक्षक हेमंत देशमूख घटनास्थळी पोहचले यावेळी दोन जणांना ताब्यात घेतले. मारामारीत तरुणांनी मोटरसायकलेचेही नुकसान केले आहे. पोलीसांनी सांगितले की घटनेची माहिती घेऊन दोषीवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी उशीरा पर्यत देवपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.