जम्मू काश्मीर : 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये रविवार पासून चकमक सुरु आहे. या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी असल्याची शक्यता सुरक्षादलाने वर्तविली आहे.

ही घटना कुलगाम जिल्‍ह्यातील केल्लम गावात घडली आहे. त्या ठिकाणी तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये 4 दहशतवादी ठार झाले असून, एक जवानही जखमी झाला आहे.

सुरक्षा रक्षकांच्या जवानांनी या परिसराला चारही बाजुनी घेरले असून अद्याप चकमक सुरू आहे.