भारतीय जवानांनी पुलवामाचा ‘बदला’ घेतला ; जैशचा कमांडर ‘मास्टरमाईंड’ सज्जाद भटचा ‘खात्मा’

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैशचा कमांडर सज्जाद भट याचा खात्मा केला आहे. तर त्याच्यासोबत तौसीफ या दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला मात्र या चकमीत एक भारतीय जवानदेखील शहिद झाला आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेरलं असून परिसराची झाडाझडती सुरु आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सज्जादचा सुरु होता शोध
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आईडी स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा सज्जाद हा मास्टरमाईंड होता. त्यानेच कारमध्ये आईडी भरून हल्ला करण्याचा कट रचला होता. तेव्हापासून सुरक्षा दलांकडून त्याचा शोध सुरु होता.

भटला विकण्यापुर्वी ७ वेळा विकली होती कार
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही जलील याने २०११ मध्ये खरेदी केली होती. ती कार ७ वेळा विकली गेली होती. त्यानंतर ती शेवटची सज्जादने खरेदी केली होती.

कोण आहे सज्जाद भट ?
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर त्यात ४० जवान शहिद झाले होते. या हल्लाचा मास्टरमाईंड सज्जाद भटबद्दल NIA ने केलेल्या तपासात खुलासा केला होता. भटने हल्ल्याच्या आधी इको कार खरेदी केली होती. भट हा दक्षिण काश्मीरच्या बिजेहरा येथील राहणारा आहे. हा परिसर जैशचा गड मानला जातो. भट याने मदरसा सिराज-उल-उलम मधून शिक्षण घेतले आहे. भटची आई त्राल येथील राहणारा आहे. बुरहान वानी याच्या खात्म्यानंतर त्राल येथे झालेल्या हिंसाचारात त्याच्या आई वडिलांनी भाग घेतला होता. भटची ओळख आत्महघाती हल्लेखोर म्हणूनही आहे. त्याला २०१८ मध्ये पकडण्यात आले होते. तर त्याच्या वडिलांना २०१७ मध्ये पकडण्यात आले होते.

आरोग्य विषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय