काश्मीरमधील शोपियांत ‘चकमक’, 2 अतिरेक्यांचा ‘खात्मा’, ‘सर्च’ ऑपरेशन सुरू

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील शोपियांत सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.

याबाबत एका पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या रेबान परिसरात अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर या परिसराला सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला व तपासणी सुरु केली. या तपासणीच्या दरम्यान त्यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलाने प्रतिउत्तर दिले. या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचे सांगण्यात आले.

सीआरपीएफ, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्स यांच्या संयुक्त कारवाईत खोजपुरा परिसरात चकमक झाली होती. त्यात एका अतिरेक्याचा मृतदेह सुरक्षा रक्षकांना मिळाला आहे.