जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था –  जम्मू काश्मीरमधील हंदावाडामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. काही दहशतवादी परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चकमक सुरु झाली.त्यात चार जवान शहिद झाले होते.

पुलवामान हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत असतानाच सुरक्षा दलाकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन राबवविले जात होते. त्यावेळी हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये गुरुवारपासून चकमक सुरु होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहिम सुरु आहे.

यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आला. तर चकमकीत चार जवान शहिद झाले आहेत. त्यात सीआऱपीएफचे दोन जवान, तर जम्मू काश्मीर पोलीस दलातील दोन जवानांचा समावेश आहे. तर सीआरपीएफचे दोन आणि लष्कराचे सात असे नऊ जवान जखमी झाले आहेत