धुळे : साक्री रोड परिसरात चोरी करणारे दोघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस हद्दीतील विविध चोरींचा उलगडा झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. साक्रीरोड परिसरातील घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागरीकांनी पकडुन शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.

शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रात्री गस्तीच्या वेळी पोलीसांना तपासणी दरम्यान इंदौरहुन चोरीस गेलेली तवेरागाडी गुरुद्वारा जवळ मोकळ्याजागेत बेवारस स्थितीत सापडली आहे. जिल्ह्यातील सराईत गुंड याला हद्दपार करण्यात आले होते. तो शहर हद्दीत फिरताना आढळला पोलीसांनी त्याला गजाआड केले. रविवारी दुपारी संतोषी माता चौकात वकील खेडकर यांना लुटणाऱे दोन चोरट्यांना पोलीसांनी पकडुन गजाआड केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सायंकाळी शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहिम राबवून बंदोवस्त लावून तपास करण्यात आला.

मध्यरात्री गस्त व तपासणी करताना पोलीसांना गुरुद्वार जवळ एक बेवारस स्थितीत उभी असलेली तवेरा गाडी क्रं.एम एच 45 टी 0919 सापडली आहे. तवेरागाडी 30 सप्टेंबर रोजी परराज्यातून मध्यप्रदेशातून चोरीस गेली होती. याबाबत इंदौर येथील छोटीग्वाल टोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा नोंद आहे. सदर वाहन हस्तगत करुन भा.द.वि.369 प्रमाणे गुन्हा नोंद करुन मालक अनिल चंद्रकांत असोलकर यांना तवेरा गाडी परत देण्यात आली.

जिल्ह्यातील एका सराईत गुंडास हद्दपार केले असतानाही तो शहरात भटकंती करत होता. अशी माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तातडीने माहिती आधारे रेल्वेस्टेशन परिसरातून गुन्हेगार ललीत ज्ञानेश्वर मराठे (वय 23, रा.भडकचाळ, सुरतवाला बिल्डींग) यास ताब्यात घेतले.

संतोषी माता नगरात वकील खेडकर यांना लुटणाऱ्या दोन चोरट्यांना काही तासाच पोलीसांनी गजाआड केले आहे. चोरट्यांनी एटीएम कार्ड, पेन ड्राईव्ह तपासणी करताना जप्त करण्यात आला आहे. भा.द.वि.392,341,34 प्रमाणे शहर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील साक्री रोड परिसरात सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यत मोगालाईतील एका घरातून चोरी करताना नागरीकांनी दोन चोरट्यांना नागरीकांनी पकडले, मारहाण करत चोरट्यांना शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.

सनी जोसेफ स्टॉल (वय 27), गोकुळ हरिष मोरे (वय 19) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून एक गँस सिंलेडर, एक सगुना कंपनीची इलेट्रीक मोटर असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.राजकुमार उपासे, ए एस आय हिरालाल बैरागी, नाना आखाडे, पो.कॉ.भिका पाटील, पो.ना.मुक्तार मन्सुरी, सतिष कोठावदे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदिप पाटील, कमलेश सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, अविनाश कराड, तुषार मोरे, राहुल पाटील, राहुल गिरी यांनी केली आहे.

Visit : Policenama.com