दोन अट्टल मोबाईल चोरांना अटक, २१ मोबाईल जप्त

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

 

शहरातील आठवडा बाजारासह विविध ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणार्‍या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकवीस मोबाईल व एक टॅब असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गौस हुसेन बागवान (वय 22), मुस्तफा हुसेन बागवान (वय 23, दोघे रा. मोमीन गल्ली, काजीवाडा, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिली.
[amazon_link asins=’B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7d2533e-d228-11e8-92fd-d510c96f6a68′]

मिरज शहरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले. त्यानुसार मोबाईल चोरट्यांना पकडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. येथील दत्त चौकातील आठवडा बाजार येथे पोलिस गस्त घालीत असताना गौस बागवान व मुस्तफा बागवान  संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून एकवीस मोबाइल व एक टॅब असा सव्वा लाखांचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

जप्त करण्यात आलेले मोबाईल त्यांनी बसस्थानक, दर्गा परिसर, आठवडा बाजार येथे गर्दीचा फायदा लोकांकडून चोरले होते. असे आणखी गुन्हे कुठे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिस लक्ष्मण जाधव, सचिन धोत्रे यांनी सहभाग घेतला.