अहमदनगर : शहरातून दोन टन प्लास्टिक जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दाळमंडई परिसरात छापा टाकून तब्बल दोन टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.

महापालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आडते बाजार, दाळमंडई रस्त्यावर दोन छोट्या ट्रकमधून प्लास्टिकची वाहतूक केली जात होती. महापालिकेच्या पथकाने या ट्रकची तपासणी केल्यावर त्यात प्लास्टिक आढळून आले. सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीचा दोन टनांपेक्षा अधिक प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्वच्छता निरीक्षक पी.एस. बिडकर, स्वच्छता निरीक्षक अविनाश हंस यांच्यासह मुकादम व सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like