पुण्यातील २ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. या कारवाईदरम्यान अलका टॉकिजजवळील टिळक चौकात १० जून रोजी कार्यरत असलेल्या दोन वाहतुक पोलिसांनी दुचाकी चालकावर कारवाई न करता १ हजार रुपयांची मागणी करत लायसन्स घेतले. तो हेल्मेट घेऊन परतला मात्र त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत त्यांनी वाहनचालकाला धक्काबुक्की केली. याप्रकारानंतर त्याने तक्रार केल्यानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार सुनील ज्ञानदेव डगळे आणि पोलीस नाईक निलेश रावसाहेब काळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

काय घडले ?
पोलीस हवालदार सुनील डगळे आणि पोलीस नाईक निलेश काळे यांची नेमणूक विश्रामबाग वाहतुक विभागात आहे. ते दोघे १० जून रोजी अलका टॉकीजजवळील टिळक चौकात नेमणूकीस होते. त्यावेळी कृष्णा काळे हे मेसमधून जेवण घेतल्यानंतर विना हेल्मेट टिळक चौकातून जात होते. त्यावेळी डगळे आणि काळे यांनी त्यांना अडविले. त्यांनी विष्णू काळे यांच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली आणि त्यांचे लायसन्स ठेवून घेतले. त्यांना तेथून जाऊ दिले.

मात्र काही वेळाने काळे हेल्मेट घेऊन आले. माझ्याकडे हेल्मेट आहे. मला लायसन्स परत द्या अशी विनंती केली. तेव्हा दोघांनी त्यांना ते दिले नाही. तक्रारदार विष्णू काळे यांनी दूर जाऊन दोघांचे फोटो काढले आणि चित्रण करू लागले. तेव्हा त्यांनी काळे यांना पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली आणि संभाजी चौक पोलीस चौकीत नेले. तेथे मारहाण करून मोबाईल काढून घेत त्यांचा मोबाईल काढून घेतला त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे सीम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून घेत पोलीस शिपाई अनिल जामगे यांच्यासोबत टिळक चौकात पाठवून गाडीवर बसवून त्यांचे फोटो काढले. त्यांच्यावर हेल्मेट कारवाई केली. त्यानंतर कृष्णा काळे यांनी त्यांच्या मित्रांना बोलवून चलन पेड केले.

दखल घेत केले निलंबित
त्यानंतर त्यांनी पोलीस आय़ुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत त्यांनी चौकशी केली. तेव्हा दोघांचेही कृत्य खात्याच्या शिस्तीस बाधा आणणाऱे असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांची चौकशी होईपर्यंत दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस