हैद्राबादजवळ 2 रेल्वेची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 30 जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादजवळ एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन रेल्वेमध्ये समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा भीषण अपघात कचीगुडा रेल्वे स्टेशनवर घडली. या घटनेनंतर आता बचाव पथकाकडून मोहीम राबवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या रेल्वेतील 30 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवाशांची बचाव पथकांकडून सुटका करुन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या अपघातातील 10 प्रवासी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना तेव्हा झाली जेव्हा एक MMT रेल्वे स्थानकात पहिल्यापासून उभ्या असलेल्या कोंगू एक्सप्रेसला येऊन धडकली. असे सांगण्यात येत आहे की ही घटना सिग्नल फेल झाल्याने घडली. या भीषण घटनेनंतर आता रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com