दोन वाहन चोरांकडून ४ लाखांच्या ८ दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी शहर आणि ग्रामीण परिसरात वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून चार लाखांच्या ८ दुचाकी जप्त करुन पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने चाकण येथील बाजारपेठेत केली.
आकाश राजाभाऊ शिंदे (वय-१९ रा. जंबुकरवस्ती, खराबवाडी, चाकण), अक्षय अनिल लोमटे (वय-१९ रा. जंबुकरवस्ती, खराबवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस नाईक सचिन उगले यांना वाहन चोर आकाश शिंदे चाकण येथील बाजारपेठेत येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मर्गदर्शनाखाली सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील यांनी चाकण बाजारपेठेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच शिंदे पळून जात असताना त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची कागदपत्रे मागितली असता त्याने दुचकी चोरीची असल्याचे कबुल केले. तसेच त्याचा साथिदार अक्षय लोमटे याच्या मदतीन चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३, नगिडी, १, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून आठ दुचाकी जप्त केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून १ सुझुकी जिक्सर, १ पल्सर, ५ स्प्लेंडर, १ अॅक्टीव्हा दुचाकी जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली.
Loading...
You might also like