धुळे : पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने मागिल दोन दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्यात माणसे, जणावरे वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. रविवार (४ जुलै) कान नदीच्या पुरात दोघे वाहून गेल्याची घटना घडली आहे. बाळू शाईराम ठाकरे (२३), पंडित उलुशा गावित (२५, दोन्ही रा. गरताड, ता साक्री) अशी पुरात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरीक ञस्त झाले आहेत. मुसळधार पावसामुळे साक्री, पिंपळनेर, आमळी भागातील गावात पाणी शिरल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. पांझरा नदी पात्रात २२,००० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कान नदीला देखील पुर आला आहे. या पुरात बाळू ठाकरे आणि पंडित गावित काल रविवारी वाहून गेले.

पांझरा नदीवरील पाच पुलांपैकी चार पुल पाण्याखाली गेले आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिध्देश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर चौपाटी या रस्तावर तीन फुट पाणी साचले आहे. सिध्देश्वर हॉस्पिटल तळ मजल्यात पाणी शिरल्याने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य सुरु आहे. गणपती मंदिराजवळ रस्त्यावर नागरीकांनी उभ्या केलेल्या पाच ते सहा दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. काही वेळात पुराच्या पाण्यात वाढ होणार असून ४०,००० क्युसेस पाण्याचा विसर्ग होणार आहे.

प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात असून सर्वांनी सतर्क राहण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like