धुळे : गोंदुर गावाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दोन शिक्षक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदुर रस्त्यावर घडली आहे. मृत्यू झालेले दोघेही शिक्षक आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री गोंदुरहून धुळ्याकडे येणारी दुचाकी आणि धुळ्याहून गोंदुर कडे जाणारी दुचाकी वळण रस्त्यावर अचानक समोरासमोर आल्याने जोरदार धडक झाली. ही बातमी गावात कळताच ग्रामस्थांनी रस्त्यावर धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या दोघांनाही रिक्षाने तातडीने चक्करबर्डी येथील रुग्णालयात भरती केले. मात्र उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.

आज (शनिवार) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनमध्ये सुरु होते. या घटनेमुळे गोंदुर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी