पुण्यात पार्किंगच्या वादातून दुचाकी पेटवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरालगत दुचाकी पार्किंग करण्याच्या वादातून जेष्ठ नागरिकाला मारहाणकरून दुचाकी पेटविल्याची घटना घडली. दोन दिवसांपुर्वी महमंदवाडीतील वाडकर मळ्यात ही घटना घडली.

याप्रकरणी मधुकर वाडकर (वय 60, रा. महमंदवाडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर यांनी रविवारी त्यांच्या घराशेजारील रस्त्यावर दुचाकी पार्क केली होती. त्याचा राग आल्यामुळे एकाने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर दुचाकी पेटवून नुकसान केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे अधिक तपास करीत आहेत.