अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वेगातील दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे रविवारी दुपारी घडली.

तिरुमल शंकर पवार (३५, रा. देवकर वस्ती, कोणार्क कॅम्प समोर, म्हाडा कॉलनी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ०३:३० वाजताच्या सुमारास पुणे आळंदी रस्त्यावरून पवार हे आपल्या दुचाकीवरून जात होते. ते दिघीतील मॅगझिन चौकाजवळ आले असता त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात जखमी झालेल्या पवार यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तपास दिघी पोलीस करीत आहेत.

दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांचा तपास भाजप सरकारला करायचा नाही

सातारा जिल्ह्यात गावठी बॉम्बचा स्फोट ; एक गंभीर जखमी