पुण्यात वादावादीतून तरुणाने दुचाकी पेटवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीतून तरुणाने मोटारसायकल पेटवून देण्याचा प्रकार मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावात घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी साईनाथ महादेव पानगटकर (वय २४, रा. महादेव मंदिराच्या मागे, म्हाळुंगे गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आकाश राजेश मुंढे (वय २३, रा. म्हाळुंगे गाव) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पानगटकर आणि मुंढे हे म्हाळुंगे गावात जवळ जवळ राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. त्यावेळी पानगटकर याने मुंढे याला शिवीगाळ करुन तुझी गाडी मी ठेवत नाही असा दम दिला होता. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास मुंढे याची होंडा शाईन मोटारसायकल आग लावून पेटवून दिली. त्यात त्याची मोटारसायकल जळून नुकसान झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like