महागड्या दुचाकी चोरणा-या तीन सराईतांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पार्क केलेल्या महागड्या दुचाकी चोरणा-या तीन सराईत वाहन चोरांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून दोन लाखांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई खडक पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी रोडवर केली.

राज केशव धुमाळ (वय-२४ रा. कोंढवा), सोमनाथ युवराज सोनवणे (वय-२१, रा. बारामती), शुभम मधुकर कदम (वय-२० रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

जाहिरात

खडक पोलीस ठाण्यतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना छत्रपती शिवाजी रोडवर पार्कींग केलेल्या वाहनांजवळ तीनजण संशयीतरित्या उभे असल्याचे दिसून आले. त्यातील एकजण दुचाकीचे हॅन्डल हलवून चेक करत असताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या तिघांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख रुपये किंमतीची यामहा कंपनीची आर.झेड.आर, एक पल्सर, ज्युपिटर असा एकूण दोन लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी वडगाव निंबाळकर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपसात उघड झाले आहे. आरोपींनी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (दि.४) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली.

जाहिरात

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे,शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार जी.बी. क्षीरसागर, जाधव, पोलीस शिपाई महेश कांबळे, बारवकर, आशीष चव्हाण, राकेश क्षीरसागर, प्रमोद नेवसे, संदीप कांबळे यांच्या पथकाने केली.

नायब तहसिलदार तिसर्‍यांदा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात