दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, ११ लाखांच्या दुचाकी जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे शहर पोलिसांच्या तपास पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ३४ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दिनेश मधुकर वाघ (वय -३०), सतिष आनंदा वाघ (वय -३८ दोन्ही रा. उभंड ता. धुळे), आशिष राजेंद्र शर्मा (वय – ३६, रा. नाशिक) आणि जितेंद्र दिगंबर मोहीते (वय- ३५, रा. उभंड ता. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील बसस्थानक, न्यायालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स आदी ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेलेल्या होत्या. दुचाकी चोरी करणारे चोरटे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत होते. मात्र, ते सराईत नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. शहर पोलिसांच्या शोध पथकाने पेट्रोलिंग व गुन्हेगारांवर वॉच ठेवून शोध घेतला असता दिनेश वाघ, सतिष वाघ यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून आशिष शर्मा आणि जितेंद्र मोहीते यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ३४ दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ उपस्थित होते.

ही कारवाई उपअधीक्षक सचिन हिरे आणि पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, प्रकाश पाटील, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदिप पाटील, रवि गिरासे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like