तासगावमध्ये दुचाकी चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – तासगाव येथे एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. रवी सलगर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. त्याच्या कडून ३० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे.
Motor-Bike
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रेकॉर्ड वरील व पाहिजे असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. पथक तासगाव मध्यें पेट्रोलिंग करीत असताना तासगाव कॉलेज कॉर्नरवरून एक जण दुचाकीवरुन संशयितपणे जाताना दिसला, त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं आपल नाव रवि सलगर असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबतीत विचारले असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्यानें ही दुचाकी तासगाव येथील वरचे गल्ली येथून चोरल्याची कबुली दिली, याबाबत तासगाव पोलीसात गुन्हा दाखल आहे. त्याला पुढील तपासासाठी तासगाव पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उदय साळुंखे, सागर टिंगरे यांनी केली.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like